कोकणातील प्रसिद्ध राजापुरची गंगा

--

गंगा कुंड तीर्थक्षेत्र राजापूर गाव उन्हाळे

रत्नागिरी येथील राजापूरच्या उन्हाळे गावातून राजापूरची गंगा वाहते. उन्हाळे गावामधूनच गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगातीर्थाच्या घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.

स्थानिक दंतकथेनुसार, गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे. वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले, त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभरची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली.

गंगेचे झरे ३१५० चौरस यार्ड परिसरात आहेत. तेथे मुख्य काशिकुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत. सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले, की ‘गंगा आली’ असे म्हणतात. गंगेच्या जवळ उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्या ठिकाणी स्नान करून नंतर गंगास्नानाची परंपरा होती तसेच, गंगास्नानानंतर तीन-साडेतीन मैलांवरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात होता. गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे.

साधारणपणे दर ३ वर्षांनी गंगा येते परंतु काही हवामान बदलामुळे दरवर्षी गंगा येते असे म्हटले जाते. हे ठिकाण अतिशय सकारात्मक पवित्र आणि शांत आहे. गंगा नदीत स्नान केल्यास पाप धुतले जाते असे म्हणतात. मी 7वीत असताना या ठिकाणाला भेट दिली होती कारण गंगा नदीत स्नान करण्याची ही माझी स्वप्नातील इच्छा होती. मला माहित नाही की ही जादू आहे की ती निसर्गाने किंवा देवानेच निर्माण केली आहे पण ती निसर्गाची आणि देवाची देणगी आहे. या ठिकाणाला भेट द्या आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजसाठी एवढंच पण पुढच्या वेळी येईन तेव्हा त्या वेळी मी माझ्या स्वत:च्या अनुभवासह आणि त्यामागील कथा आणि इतिहासासह नवीन न पाहिलेली जागा घेऊन येईल.

जर तुम्हाला माझे लेखन आणि ठिकाण आवडले असेल तर लाईक कमेंट करा फॉलो करा आणि मला आणखी काही ठिकाणे सुचवा जी तुम्हा सर्वांना पहायची आहेत 👀

So Till Then Stay Tuned….

गाईच्या मुखातून वाहणारे गंगाजल
गंगा कुंड
गंगा कुंड

--

--

" Lobhas A Journey Through Words "

The uncover hidden traveling places and exotic locations through the lens of my own journey. With every story, I invite you to explore the places with me.